Bangladesh vs India, 3rd ODI : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या जात असलेल्या शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताचा सलामीवीर ईशान किशनने (Ishan Kishan) वादळी द्विशतक (Ishan Kishan quickest ODI double century) ठोकलं. तर विराटने शतकीय खेळी केल्याने बांग्लादेशला अखेरच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय. अखेरच्या सामन्यात भारताने बांग्लादेशला 227 धावांनी पराभूत केलं आहे. ईशान किशनने जेवढ्या रन केल्या, तेवढ्या धावा संपूर्ण बांग्लादेशच्या संघाला करता आल्या नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव (Zahur Ahmed Chowdhury Stadium, Chattogram ) येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांग्लादेशसमोर 409 धावांचं आव्हान ठेवलं. त्यात ईशान किशनची (Ishan Kishan) 210 धावा आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) 113 धावांचा समावेश आहे. अखेरच्या षटकात वॉशिंग्टनने सुंदर (Washington Sundar) फटकेबाजी करत 37 धावा केल्या. 


भारताने दिलेल्या 410 धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ पत्त्यासारखा कोसळला. शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) वगळता एकही खेळाडूला मोठी कामगिरी करता आली नाही. शाकिबने 43 धावा केल्य, त्यालाही अर्धशतक देखील ठोकता आलं नाही. तर 7 खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. त्यानंतर बांग्लादेशचा संघ पुर्ण 50 ओव्हर देखील खेळू शकला नाही.


आणखी वाचा - कोहली तुस्सी ग्रेट हो... Virat Kohli ने रचला नवा इतिहास; Ricky Ponting चा महारेकॉर्ड मोडला!


दरम्यान, पहिल्या दोन सामन्यात बांग्लादेशने (IND vs BAN ODI) भारताचा पराभव करत मालिका जिंकली होती. त्यानंतर आजचा सामना जिंकून भारताने मालिकेत लाज राखली आहे. एकच सामना जिंकला पण सॉलिड जिंकला, अशी कमेंट सध्या भारतीय क्रिकेटप्रेमी करताना दिसत आहेत.