धरमशाला : धरमशाला इथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारत संघ 112 रन्सवर ऑलआउट झाला आहे.


भारतीय फलंदाजांची हाराकिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी वगळता सर्वच भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे फक्त 112 धावांवर भारताचा डाव आटोपला आहे. त्यामुळे सर्वच क्रिकेट रसिकांच्या मनात हा सामना हातातून गेल्याची भावना निर्माण झाली असणार. परंतु थोडसं इतिहासात डोकाऊन बघितलं तर आपण हे करू शकतो, असं तुमच्या लक्षात येईल. होय हे खर आहे, कारण सर्वात कमी धावी करून सामना जिंकण्याचा विक्रम भारताच्याच नावावर आहे. आणि तोसुद्धा पाकिस्तानविरूद्ध !


ऐतिहासिक सामना


तो ऐतिहासिक दिवस होता 22 मार्च 1985 चा. शारजात झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला. याआधी  लागोपाठ झालेल्या दोन पराभवांचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तान आतूर होतं. इम्रान खानने जबरदस्त गोलंदाजी करत भारताला लगेच गुंडाळलं. गावस्कर, शास्त्री, श्रीकांत, वेंगसरकर यारखे दिग्गज असतांनासुद्धा भारताचा डाव 125 धावात आटोपला. इम्रानने 6 बळी घेतले. 


इतिहासाची पुनुरावृत्ती होईल 


भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा सामना हातातून गेल्याची भावना स्टेडीयममध्ये होती. परंतु कपिल देवने अफलातून गोलंदाजी केली. भारतीय खेळाडूंनी जीव ओतून क्षेत्ररक्षण करत पाकिस्तानला प्रत्येक रनसाठी झुंझायला भाग पाडलं. पाकिस्तानचा डाव फक्त 87 धावात आटोपत भारतीय संघाने इतिहास घडवला.
हा कुठल्याही संघाने कमी धावा करून सामना जिंकल्याचा हा विक्रम आहे. आतासुद्धा भारतीय संघ ही करामत करून इतिहास घडवू शकतो.