मुंबई : भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर खेळला जातोय. आज सामन्याचा तिसरा दिवस असून भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ केला. याचसोबत भारताने दुसरा डाव घोषित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने न्यूझीलंड टीमला 540 धावांचे लक्ष्य दिलं आहे. टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात मयंक अग्रवालसह चेतेश्वर पुजारा सलामीला उतरले होते. यावेळी मयंक 62 आणि पुजारा 47 धावांवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल 47 धावा, श्रेयस अय्यर 14 धावा आणि विराट कोहली 36 धावा करून बाद झाला. 


टीम इंडिया मोठी धावसंख्या बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना एजाज पटेलने दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेत मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. रचिन रवींद्रने 3 विकेट्स घेतले. अखेरीस अक्षर पटेलने 41 धावांची तुफानी खेळी केली.


न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 62 रन्समध्ये गारद


किवी टीमने पहिला डाव सुरू केला तेव्हा सिराजने अप्रतिम गोलंदाजी करत किवींना 3 धक्के दिले. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम, विल यंग आणि रॉस टेलर यांना बाद केलं. 


न्यूझीलंडच्या पहिल्या डावात संपूर्ण संघ 62 धावांत गारद झाला आणि टीम इंडियाला 263 धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडकडून काइल जेमिसनने 17 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने अप्रतिम गोलंदाजी करताना 4 विकेट्स घेतले. अक्षरने 2, मोहम्मद सिराजने 3, जयंत यादवने 1 बळी घेतला. 


न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान असल्याने भारताला ही कसोटी जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे.