श्रीलंकेचा रडीचा डाव, भारताचा डाव घोषित
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने रडीचा डाव खेळला. प्रदूषणामुळे सामन्यात दोनवेळा व्यत्यय आला.
नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने रडीचा डाव खेळला. प्रदूषणामुळे सामन्यात दोनवेळा व्यत्यय आला.
रडीचा डाव
दिल्लीतील प्रदूषणामुळे श्रीलंकेचे अनेक खेळाडू मास्कसह मैदानावर खेळत होते. त्यावेळी भारताने ५०० धावांचा टप्पा पार केला होता. या दरम्यान, श्रीलंकेच्या खेळाडूंकडून खेळ थांबवण्याची मागणीही झाली होती. मात्र कोहलीने त्यास नकार दिला.
अखेर श्रीलंकेच्या रडीच्या डावासमोर कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. श्रीलंकेने स्मॉगचे कारण सांगत रडीचा डाव खेळला. मात्र त्याला जशास तसे उत्तर कोहलीने दिले आणि डाव घोषित केला.
भारताकडून डाव घोषित
भारताने पहिला डाव ७ बाद ५३६ धावांवर घोषित केला. श्रीलंकेचे खेळाडू मैदानावर उतरले असून त्यांचे दोन गडी बाद झालेत.