जमैका : नवोदित खेळाडू हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह यांच्या धडाकेबाज खेळीनंतर भारताची वेस्टइंडिजवर मात करत यजमानांना व्हाईटवॉश देत २५७ धावांनी टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. कसोटी मालिका टीम इंडियाने खिशात टाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने टी-२०, एकदिवसीय मालिकेनंतर वेस्टइंडिजविरोधातील कसोटी मालिका देखील खिशात घातली आहे. दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर २५७ धावांनी विजय मिळवला. हनुमा विहारीची शतकी खेळी आणि जसप्रीत बुमराहच्या हॅटट्रिकच्या जोरावर टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. 


विंडीजचा पहिला डाव ४७.१ षटकात ११७ धावांत भारताने गुंडाळला. त्यामुळे भारतानं तब्बल २९९ धावांची मोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या भारतीय संघानं १६८ धावांवर ४ गडी बाद असताना डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला ४६७ धावांचे उद्दीष्ट पार करण्यासाठी देण्यात आले. त्यानंतर फलंदाजीला आलेला विंडीज संघ केवळ २१० धावाच करू शकला आणि टीम इंडियाने ही कसोटी २५७ जिंकली.