केप टाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधली तिसरी वनडे बुधवारी केप टाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहे. ६ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये याआधीच भारत २-०नं आघाडीवर आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत ३-०ची आघाडी घेऊन इतिहास घडवण्याची सूवर्णसंधी विराट ब्रिगेडकडे असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डरबनच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेट्सनं तर सेंच्युरिअनमधल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं दणदणीत विजय झाला होता. याआधी फक्त दोनच वेळा १९९२-९३ आणि २०१०-११मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच जमिनीवर एका सीरिजमधल्या दोन वनडे जिंकल्या होत्या. दोन वनडे जिंकल्या तरी सीरिज मात्र भारताला गमवावी लागली होती.


केप टाऊनमध्ये बुधवारी होणारी तिसरी वनडे भारत जिंकला तर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याच विरुद्ध तीन वनडे जिंकण्याचं रेकॉर्ड भारत करेल. भारतला ही संधी चालून आलेली असतानाच दक्षिण आफ्रिकेला मात्र दुखापतीनं ग्रासलं आहे. एबी डिव्हिलियर्स, फॅप डुप्लेसिस आणि क्विंटन डीकॉक या तिन्हि खेळाडूंना दुखापतीमुळे खेळता येणार नाही.