India vs Australia, World Cup Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये एक लाख तीस हजार प्रेक्षकांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्याचं पहायला मिळालं आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा उभ्या केल्या. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांची गरज आहे. वर्ल्ड कपमध्येच पहिल्यांदाच टीम इंडियाला ऑलआऊट झाली आहे. टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली ती कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) आक्रमक अंदाजामुळे... रोहित शर्माने धुंवाधार सुरूवात केली मात्र, शुभमन गिलने (Shubman Gill) चूक केली अन् हातात कॅच देऊन बसला. रोहित आणि विराटने (Virat Kohli) डाव सावला पण रोहितने मॅक्सवेलला सिक्स मारण्याच्या नादात बाद झाला. सर्वांना अपेक्षा असलेला श्रेयस अय्यर कमाल दाखवू शकला नाही. 11 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 81 धावा केल्या खऱ्या पण 3 विकेट्स पडल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या आशा मावळल्या. केएल राहुलने अर्धशतक ठोकलं पण त्याला टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवता आलं नाही. ज्यांच्याकडून फिनिशिंगची अपेक्षा होती, त्या रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना महत्त्वाच्या सामन्यात खेळता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियाला फक्त 240 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क याने 3 तर जॉश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी 2-2 विकेट्स नावावर केल्या.



टीम इंडियाच्या गोलंदावर लक्ष


टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याच्या कामगिरीवर आता सर्वांच्या नजरा असणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पहिले तीन खेळाडू सामना फिरवू शकतात. त्यामुळे दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवण्याची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असणार आहे. त्याचबरोबर फिरकीपटूंची कामगिरी देखील महत्त्वाची ठरेल.


ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.