जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे सध्या सीरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता इतिहास रचायचा असेल तर भारताला तिसरी टेस्ट जिंकावी लागणार आहे. मात्र जोहान्सबर्गची टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या नेमक्या चुका काय झाल्या ते पाहूयात.


शेवटच्या दिवशी अग्रेसिव कॅप्टन्सी दिसली नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

के.एल राहुलचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. ज्याचा परिणाम सामन्यामध्ये दिसला. शेवट्या दिवशी जेव्हा दक्षिण आफ्रिकेला 122 रन्सची गरज होती त्यावेळी तिथे अग्रेसिव कॅप्टन्सी दिसून आली नाही. काही ठिकाणी योग्य निर्णयही राहुलला घेता आले नाहीत. 


शार्दूल सोडून सगळेच फेल


भारतीय गोलंदाजांचं नेहमी कौतुक होत असतं. मात्र जोहान्सबर्गच्या कसोटीत शार्दूल ठाकूर सोडून कोणत्याची गोलंदाजाची चमक पहायला मिळाली नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांची गोलंदाजी योग्यरित्या दिसली नाही. तर सिराज दुखापतीच्या कारणामुळे गोलंदाजी करू शकला नाही.


मयंक अग्रवाल आऊट ऑफ फॉर्म


रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी ओपनिंग सांभाळली. मात्र यावेळी दोन्ही टेस्टमध्ये मयंक पूर्णपणे फेल झाला आहे. मयांकने चार डावांमध्ये 60, 4, 26, 23 असे रन्स केले आहेत. 


पहिल्या डावात कमी स्कोर


या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी फार निराश केलं. यामध्ये के.एल राहुल शिवाय कोणताही खेळाडू चांगले रन्स करू शकला नाही. जारा-रहाणे-मयंक-पंत-हनुमा हे सर्व खेळाडूंनी निराशा दाखवली.