मुंबई : Yuvraj Singh is Back : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह (Yuvraj Singh) यांचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला. त्यांने कमबॅक करताना जोरदार फटकेबाजी केली. सलग चार चेंडूत त्यांने 4 उत्तुंग षटकार (Six) खेचले आणि उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. छत्तीसगडमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (India Legends vs South Africa Legends ) महान खेळाडूंना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. येथे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2021 चा एक शानदार सामना खेळला.


भारतीय संघ विजयी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण अफ्रीका लेजेंड्सने  (South Africa Legends) नाणेफेक जिंकून प्रथम  इंडिया लेजेंड्सला (India Legends) फलंदाजी करण्यास पाचारण केले. निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून भारताने 203 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल, दक्षिण अफ्रीका लेजेंड्स 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 148 धावा करू शकला. हा सामना भारताने 56 धावांनी जिंकला.


युवराजची स्फोटक फलंदाजी



युवराजने (Yuvraj Singh)  केवळ 22 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या. दक्षिण अफ्रीका लेजेंड्सचा गोलंदाज झेंडर डी ब्रुइनच्या (Zander de Bruyn) 18 व्या षटकात त्याने सलग चार चेंडूत चार षटकार ठोकले. विशेष म्हणजे 2007 मध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट बोर्डेने इंग्लंडमध्ये एका षटकात सहा षटकार ठोकले होते. स्टुअर्टने जागतिक क्रिकेटमध्ये आपली दहशत निर्माण केली.


सचिन, युसुफची कमाल


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 37 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 60 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय युसुफ पठाणने  (Yusuf Pathan) 3 आणि युवराजने (Yuvraj Singh) 2 गडी बाद केले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी युवीची 'सामनावीर' पुरस्कारासाठी निवड झाली.