सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे मध्ये भारताचा पराभव झाला आहे. भारताचा 34 रन्सने पराभव झाला आहे. भारतीय टीमची सुरुवात खूपच वाईट झाली. फक्त 4 रनवर भारताने 3 विकेट गमावले. या दरम्यान भारताचा शिखर धवन, विराट कोहली आणि अंबाती रायडू स्वस्तात माघारी परतले. यानंतर रोहित शर्मा आणि धोनीने भारताचा खेळ सावरला. दोघांमध्ये 137 रनची पार्टनरशिप झाली. त्यानंतर 51 रनवर धोनी आऊट झाला. रोहित शर्माने 133 रन केले. विराट 3 रनवर आऊट झाला. धवन आणि रायडू शुन्यावर आऊट झाला. कार्तिक 12 रनवर आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक वाचा: धोनीने वनडेमध्ये पूर्ण केले 10 हजार रन


ऑस्ट्रेलियाने आधी बॅटींग करत भारतासमोर 288 रन्सचं टार्गेट दिलं होतं. भारताला मात्र 50 ओव्हरमध्ये 254 रन्सच करता आले. 3 सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.



रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सातवं शतक ठोकलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतक सचिन तेंडुलकरने ठोकले आहेत. रोहित शर्माचं हे 22 वे वनडे शतक होतं. सोबतच त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.



टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय़ घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून पीटर हँड्सकॉम्बने सर्वाधिक 73 रन केले. त्यानंतर उस्मान ख्वाजा याने 59 आणि शॉन मार्शने 54 रन्सची खेळी केली. भारतासाठी भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवने 2-2 विकेट तर जडेजाने 1 विकेट घेतली.