धोनीने वनडेमध्ये पूर्ण केले 10 हजार रन

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्य़ा पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)ने भारतासाठी वनडे इंटरनेशनल क्रिकेटमध्ये 10,000 रन पूर्ण केले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी वनडेमध्ये एक रन करताच त्याने हा रेकॉर्ड बनवला आहे. याआधी धोनीचे 9999 रन झाले होते. पण दोन महिन्याआधी वेस्टइंडीज विरुद्ध नोव्हेंबर 2018 मध्ये त्याला 10 हजार रन पूर्ण करता आले नव्हते. या रेकॉर्ड पासून तो फक्त 1 रन दूर होता.

Updated: Jan 12, 2019, 03:44 PM IST
धोनीने वनडेमध्ये पूर्ण केले 10 हजार रन title=

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्य़ा पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)ने भारतासाठी वनडे इंटरनेशनल क्रिकेटमध्ये 10,000 रन पूर्ण केले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी वनडेमध्ये एक रन करताच त्याने हा रेकॉर्ड बनवला आहे. याआधी धोनीचे 9999 रन झाले होते. पण दोन महिन्याआधी वेस्टइंडीज विरुद्ध नोव्हेंबर 2018 मध्ये त्याला 10 हजार रन पूर्ण करता आले नव्हते. या रेकॉर्ड पासून तो फक्त 1 रन दूर होता.

नवीन वर्षातील पहिल्या वनडे सामन्यात त्याने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. धोनी भारताकडून 10 हजार रन करणारा पाचवा खेळाडू आहे. 

वनडेमध्ये 10 हजार रन करणारे खेळाडू

1. सचिन तेंडुलकर - 18426 रन

2. सौरव गांगुली - 11363 रन

3. राहुल द्रविड - 10889 रन

4. विराट कोहली - 10235 रन

5. महेंद्र सिंह धोनी - 10224 रन