मुंबई : 2018 मध्ये भारतात आशिया कप होणार आहे. पण याआधी यावर संकट घोंगावत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत पुढच्या वर्षी होणाऱ्या आशिय कप 2018 चं आयोजन करणार आहे. पण आशिया कप भारतात होणं कठीण झालं आहे. भारतात होणारा आशिया कप हा दुसऱ्या देशात खेळवला जाण्याची शक्यता आहे.


अंडर-19 आशिया कपचं आयोजन गमवलं


पाकिस्तानसोबत भारताचे संबंध बिघडले आहेत. यामुळे भारत अंडर-19 आशिया कपचं आयोजन याआधीच गमावून बसला आहे. आता आशिया कप 2018 चं आयोजनाची संधी देखील भारता बाहेर जाण्याची शक्यता आहे.


पाकिस्तान मागतोय नुकसान भरपाई


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची सीरीज 2012-13 मध्ये खेळली गेली होती. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट होत नसल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीमध्ये देखील गेला आहे. यासाठी बीसीसीआयकडे त्यांनी 70 मिलियन डॉलर नुकसान भरपाई म्हणून देखील मागितले आहेत.