अँटिग्वा : भारताविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १८९ धावांवर आटोपलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. उमेश यादव आणि हार्दिक पंड्याच्या प्रत्येकी तीन विकेट आणि चायनामन कुलदीप यादवच्या दोन विकेटमुळे वेस्ट इंडिजला १८९ धावांवर रोखण्यात यश मिळाले. 


भारताला या मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी १९० धावा आवश्यक आहेत. वेस्ट इंडिजकडून एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. वेस्ट इंडिजकडून सलामीवीर एव्हिन ल्युईस आणि काईल होप यांनी प्रत्येकी ३५ धावा केल्या. 


वेस्ट इंडिजचा पहिला गडी ५७ धावांवर बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले.