दुबई : 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यामध्ये सर्वांच्या आवडीची एक गोष्ट म्हणजे यावेळी भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी टी -20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानला जातोय. पाकिस्तानचा माजी फलंदाज मुदस्सर नजर या मोठ्या सामन्यापूर्वी म्हणाला की, दोन्ही संघांमध्ये भारत वरचढ दिसतोय. आणि गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानच्या संघानेही जबरदस्त कामगिरी केली आहे.


कोहलीपेक्षा धोकादायक हा फलंदाज


मुदस्सर नजर यांनी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि संघाचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसा कोहलीपेक्षा रोहितकडून जास्त धोका असेल.


मुदस्सर नजर म्हणाले, "टी-20 वर्ल्डकपमध्ये, जर एखादा फलंदाज जलद गतीने रन्स बनवतो किंवा गोलंदाज पटकन विकेट घेतात, तर तो खेळात मोठा फरक निर्माण करतो. इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या टेस्ट मालिकेतील भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर संघातील कोणताही खेळाडू तितका खास नव्हता. अगदी कर्णधार विराट कोहली, जो संघासाठी सर्वाधिक धावा करायचा, त्याने गेल्या 2-3३ वर्षांपासून शतक झळकावलं नाही. तो शतकानंतर शतक करायचा, पण त्याची कामगिरी घसरली. उलट कोहलीपेक्षा रोहित शर्मा अधिक धोकादायक आहे."


2 वर्षांनंतर भिडणार भारत-पाक


भारत आणि पाकिस्तानचे संघ 2 वर्षांनंतर आमनेसामने येतील. 2019च्या वर्ल्डकप दरम्यान दोन्ही संघ अखेर भिडले होते. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. रोहित शर्माने त्या सामन्यात 140 धावा केल्या. टीम इंडियाने 5 विकेट्सवर 336 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानने 6 विकेट्सवर 212 धावा केल्या होत्या.


पाकिस्तानने 9 वर्षांपासून टी-20 मध्ये भारताविरुद्ध विजय मिळवला नाही


भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 मध्ये एकूण 8 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 7 जिंकले आहेत तर पाकिस्तानने फक्त एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानने भारतावर शेवटचा विजय 2012 मध्ये जिंकला होता. अशा स्थितीत पाकिस्तानचा संघ 9 वर्षांपासून भारतावर विजय मिळवण्याच्या धडपडीत आहे.