IND vs NZ: दुसऱ्या टेस्टसाठी भारताचं प्लेइंग 11 ठरलं; `हे` खेळाडू होणार बाहेर?
पहिल्या सामन्यात काही खेळाडूंचा खेळ अतिशय खराब खेळ दाखवला. अशा परिस्थितीत विराट कोहली काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली टेस्ट मॅच अनिर्णित राहिली. तर दुसरी टेस्ट मॅच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करेल. पहिल्या सामन्यात काही खेळाडूंचा खेळ अतिशय खराब खेळ दाखवला. अशा परिस्थितीत विराट कोहली काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
ही असणार ओपनिंग जोडी
न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनी भारताकडून सलामीची जबाबदारी घेतली होती. शुभमनने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावलं. मयंकनेही चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीला सलामीमध्ये कोणताही बदल करायला आवडणार नाही.
अशी असेल टॉप ऑर्डर
चेतेश्वर पुजाराला तिसऱ्या नंबरवरून बाद होऊ शकतो. पुजारा बऱ्याच काळापासून चांगला खेळ करू शकत नाहीये. अशा स्थितीत विराट कोहली स्वत: त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो. त्याचवेळी अजिंक्य रहाणेला चौथ्या क्रमांकावर शेवटची संधी दिली जाण्याची खात्री आहे.
पाचव्या क्रमांकावर गेल्या सामन्याचा हिरो ठरलेल्या श्रेयस अय्यरचे स्थान निश्चित झालंय. रिद्धिमान साहा फिट असल्याची बातमी खुद्द विराट कोहलीनेच दिली आहे. अशा स्थितीत तो विकेटकीपर म्हणून मैदानात उतरेल याची खात्री आहे. साहाने पहिल्याच सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकलं होतं.
कोहलीचा या गोलंदाजांवर विश्वास
भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा न्यूझीलंड फलंदाजांसाठी घातक ठरू शकतात. अक्षर पटेल आणि अश्विनने गेल्या सामन्यात 6-6 विकेट घेतल्या होत्या. अशा स्थितीत विराट कोहलीला या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
या खेळाडूला ठेवलं जाऊ शकतं बाहेर
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इशांत शर्माला चांगली गोलंदाजी करता आली नाही. त्याला एकही विकेट मिळाली नाही. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली त्याला बाहेरचा रस्ता दाखवून युवा गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी देऊ शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिराजने चांगली गोलंदाजी केली होती.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताचं प्लेइंग 11
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.