Asia Cup 2022 Sport News : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईला पोहोचला असून सरावही करत आहे. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघासोबत होणार आहे. सामन्याआधी दुखापती असलेला पाकिस्तानचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज शाहिन आफ्रिदी दुबईत आला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसाठी धोका असल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे शाहिन आफ्रिदी संघाबाहेर आहे. जखमी असूनही शाहिन आफ्रिदी संघासह दुबईला पोहोचला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शाहिन आफ्रिदी भारताच्या खेळाडूंना भेटताना दिसत आहे.
 
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तो खेळणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. शाहिन आफ्रिदी जेव्हा भारतीय खेळाडूंसोबत बोलताना, विश्वचषकाअगोदर मी पुर्णपणे तंदरूस्त होईल, असं सांगितलं. त्यामुळे शाहिन आफ्रिदी या आशिया स्पर्धेमध्ये खेळणार असल्याच्या चर्चांणा पूर्णविराम मिळाला आहे.


Stars align ahead of the #AsiaCup2022 



दुखापती असताना शाहिनला संघासोबत ठेवण्याचा निर्णय पाकिस्तान कर्णधार बाबर आझमचा पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना सांगितलं. बाबरला शाहिन आफ्रिदी संघासोबत हवा होता, व्यवस्थापनालाही त्याच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवायचं होतं. त्यामुळे शाहिन दुबईत पाकिस्तानी संघासोबत असल्याचं अधिकारी म्हणाला. 


दहा महिन्यांनंतर 28 ऑगस्ट रोजी दुबईत आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे (India vs Pakistan) संघ आमने-सामने येणार आहेत. दोघेही 24 ऑक्टोबर 2021 रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकाच मैदानावर खेळले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला होता.