भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
इंग्लंड क्रिकेट बोर्डानं २०१८ सालच्या होम सिझनची घोषणा केली आहे.
मुंबई : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं २०१८ सालच्या होम सिझनची घोषणा केली आहे. २०१८च्या सिझनमध्ये इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध २ टेस्ट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ वनडे आणि एक टी-20 आणि भारताविरुद्ध ५ टेस्ट, ३ वनडे आणि ३ टी-20 मॅचची सीरिज खेळेल.
३ जुलै २०१८पासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होईल तर शेवटची मॅच ७ सप्टेंबरला होणार आहे. २०१९चा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडमध्येच होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपआधीचा हा दौरा म्हणजे भारतीय क्रिकेट टीमसाठी रंगीत तालीम असणार आहे.
भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक
३ जुलै २०१८- पहिली टी-20- ओल्ड ट्रॅफर्ड- मॅन्चेस्टर
६ जुलै २०१८- दुसरी टी-20- कार्डिफ
८ जुलै २०१८- तिसरी टी-20- ब्रिस्टल
१२ जुलै २०१८- पहिली वनडे- ट्रेन्ट ब्रिज
१४ जुलै २०१८- दुसरी वनडे- लॉर्ड्स
१७ जुलै २०१८- तिसरी वनडे- हेडिंग्ली, लीड्स
१ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०१८- पहिली टेस्ट- एजबॅस्टन
९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०१८- दुसरी टेस्ट- लॉर्ड्स
१८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०१८- तिसरी टेस्ट- ट्रेन्ट ब्रिज
३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०१८- चौथी टेस्ट- रोज बोल
७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०१८- पाचवी टेस्ट- केनिंग्टन ओव्हल