मुंबई : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. न्यूझीलंडने १८ रनने पराभूत केल्यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला जवळपास २२ दिवसांची विश्रांती आहे. ३ ऑगस्टपासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ३ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. ही सीरिज कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेमध्ये खेळवली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे आणि टी-२० मॅचच्या सीरिजसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. विराट आणि बुमराह हे वर्षाच्या सुरुवातीपासून खेळत आहेत. यावर्षी पहिले ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा, मग आयपीएल आणि त्यानंतर वर्ल्ड कप झाला. त्यामुळे विराट आणि बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजपासून टीम इंडियाच्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे.


टी-२० सीरिज 


३ ऑगस्ट २०१९- पहिली टी-२०- फ्लोरिडा 


४ ऑगस्ट २०१९- दुसरी टी-२०- फ्लोरिडा 


६ ऑगस्ट २०१९- तिसरी टी-२०- गयाना 


वनडे सीरिज 


८ ऑगस्ट- पहिली वनडे- गयाना 


११ ऑगस्ट- दुसरी वनडे- त्रिनिदाद 


१४ ऑगस्ट- तिसरी वनडे- त्रिनिदाद 


टेस्ट सीरिज 


२२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट- पहिली टेस्ट- एन्टीग्वा


३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर- दुसरी टेस्ट- जमैका