India Tour of South Africa आफ्रिका दौऱ्यावर केएलचा मित्रच त्याचा पत्ता कापणार?
टीम इंडिया आता आफ्रिका दौऱ्यावर (India Tour South Africa) जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे.
मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत मयांक अग्रवालने (Mayank Agarwal) धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडिया अडचणीत असताना मयांकने निर्णायक क्षणी शतकी खेळी केली. मयांकला त्याच्या या कामगिरीचं बक्षिस मिळू शकतं. टीम इंडिया आता आफ्रिका दौऱ्यावर (India Tour South Africa) जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी मयांकला संधी मिळू शकते. (india tour of south africa opener mayank agarwal might be replaced to k l rahul position for opening in test series)
मयांकला केएल राहुलच्या जागी संधी मिळू शकते. केएल आणि मयांक हे दोघेही चांगले मित्र आहेत. हे दोघेही स्थानिक पातळीवर कर्नाटक आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळतात.
मयांक तुफान फॉर्मात
मयांक सध्या तुफान कामगिरी करतोय. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली होती.
मयांकने पहिल्या डावात 311 चेंडूत 150 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 62 धावांचं योगदान दिलं. यामुळे कदाचित मयांक आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितसोबत ओपनिंग करु शकतो.
दरम्यान 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. यानंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तर टी 20 मालिकेचं नववर्षात योग्य वेळी आयोजन केलं जाईल.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 26-30 डिसेंबर, सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.
दुसरा सामना, 3-7 जानेवारी 2022, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग.
तिसरा सामना, 11-15 जानेवारी 2022, केपटाऊन.