टीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात जे केलं, तेच विराट आफ्रिकेत करणार का?
टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa 2021) आफ्रिकेत पोहचली आहे.
मुंबई : टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa 2021) आफ्रिकेत पोहचली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया (Team India) कसोटी आणि एकदिवसीय मालिका (ODI Series) खेळणार आहे. कसोटी मालिकेपासून (Test Series) या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियासमोर मोठं आव्हान आहे. (india tour of south africa team india will have chance to win test series first time in history against south africa under to virat kohli captaincy)
काय आहे आव्हान?
टीम इंडियासमोर कसोटी मालिका जिंकण्याचं आव्हान असणार आहे. कारण टीम इंडियाला अजूनही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. टीम इंडिया ही मालिका जिंकेलच, अशी अपेक्षाही केली जात आहे. त्याच कारणही तसंच आहे.
टीम इंडियाने राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वात पहिल्यांदा आफ्रिकेत आफ्रिका विरुद्ध कसोटी सामना जिंकण्याचा कारनामा केला होता. सद्य परिस्थितीत द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
त्यामुळे टीम इंडियाने ही कसोटी मालिका जिंकल्यास ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल. तसेच द्रविड कर्णधार आणि कोच म्हणून अशी कामगिरी करणारा बहुतेक पहिलाच कर्णधार आणि कोचही ठरेल.
आकडेवारी कोणाच्या बाजूने?
टीम इंडिया-आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 7 कसोटी मालिका (India vs South Africa Head To Head Record Test Series) खेळवण्यात आल्या आहेत. यापैकी 6 सीरिज या आफ्रिकेने जिंकल्या. तर उर्वरित 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली.
टीम इंडियाला महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात पहिल्यांदाच आफ्रिका विरुद्ध कसोटी मालिका अनिर्णित राखण्यास यश आले होते. ही मालिका 2010-11 या दौऱ्यात खेळवण्यात आली होती.
आफ्रिका विरुद्धचा पहिला विजय केव्हा?
टीम इंडियाने आफ्रिका विरुद्ध राहुल द्रविडच्या नेतृत्वात पहिलावहिला कसोटी विजय मिळवला होता. टीम इंडिया 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 2006-07 मध्ये आफ्रिका दौऱ्यावर गेली होती.
या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने 123 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे टीम इंडियाच्या मालिका विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर पुढील 2 सामन्यात भारताचा पराभव झाला होता. आफ्रिकेने ही मालिका 2-1 अशी जिंकली होती.
त्यामुळे आता या दौऱ्यात टीम इंडिया ही ऐतिहासिक कामगिरी करणार का, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ
टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर आणि अरजान नगवासवाला.
आफ्रिकन टीम
डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कगिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, एनरिक नॉर्तजे, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डुर डुसेन, कायल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 26-30 डिसेंबर, सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.
दुसरा सामना, 3-7 जानेवारी 2022, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग.
तिसरा सामना, 11-15 जानेवारी 2022, केपटाऊन.