केप टाऊन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहे. याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आली आहे. खेळाडूंची सुरक्षा आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicrone) धोका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. (india tour of south africa Tickets for upcoming test and odi series will not be made available after both cricket bodies took a joint decision to protect the players) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयसह (BCCI) चर्चा करुन हा मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांचा स्टेडियममध्ये जावून सामना पाहण्याचं स्वप्न भंगलं आहे. 


दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका आहे. या ओमायक्रॉनमुळे खेळाडूंना काहीही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.  


याआधी आफ्रिका सरकारकडून कोरोना नियमांचं पालन करुन स्टेडियममध्ये 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. मात्र आता खेळाडूंना कोणताही धोका संभवू नये, यासाठी हा कठोर निर्णय घेतला गेला आहे. 


कसोटी मालिकेपासून दौऱ्याला सुरुवात


टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्याची सुरुवात ही 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. दुखापतीमुळे उपकर्णधार रोहित शर्माला या कसोटी मालिकेला मुकावं लागणार आहे. त्याच्या जागी प्रियांक पांचालला संधी देण्यात आली आहे.