कोलंबो : भारत-श्रीलंका तिसऱ्या कसोटीत शिखर धवनने आपले ६ वे शतक ठोकले. शिखरने १०७ धावा करत हे शतक केले. टीम इंडिया १ बाद २०० धावा झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेला पहिली जोडी फोडण्यात यश मिळालेय. लोकेश राहुल ८५ धावांवर बाद झाला. त्याला पुन्हा एकदा शतक करण्यात यश आलेले नाही. त्याचवेळी शिखर धवन ९४ धावांवर खेळत होता. त्याने चेंडूत १०७ धावा करत आपले कसोटीतील ६वे शकत केले.


शेवटच्या कसोटीत भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली आहे. पहिल्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताची धावसंख्या १३४/० होती. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकी खेळ करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली आहे. शिखर धवन हा ६४ तर लोकेश राहुल ६७ धावांवर खेळत होते.


धवनने आपल्या अर्धशतकी खेळीत आतापर्यंत ९ चौकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलनेही त्याला चांगली साथ दिली. शिखर धवनपाठोपाठ लोकेश राहुलनेही आपलं अर्धशतक साजरं केले. राहुलने आपल्या अर्धशतकी खेळीत ६ चौकार लगावले आहेत.