Virat Kohli Called Out As Chokli Video: सध्या भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून भारतीय संघाने टी-20 मालिका 3-0 च्या फरकाने खिशात घातली आहे. आता भारतीय चाहत्यांबरोबरच खेळाडूंना वेध लागले आहेत ते एकदिवसीय मालिकेचे. या मालिकेसाठी रोहित शर्माबरोबरच विराट कोहलीही श्रीलंकेत पोहोचला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास सोशल मीडियावर विराट कोहलीचा श्रीलंकेमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक चाहता विराटला त्याच्या अडानाववरुन चिडवताना दिसत आहे. विराटला कोहली ऐवजी चोहली म्हटल्यानंतर नेमकं काय घडलं हे या व्हिडीओत दिसत असून व्हिडीओसंदर्भात वेगळीच माहिती समोर आली आहे


नेमका दावा काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली त्याच्या सहकाऱ्यांसोबत सरावासाठी तयार होत असताना ड्रेसिंग रुममध्ये तो बॅट हातात घेऊन हवेत फटेबाजी करत वॉर्मअप करत होता. मात्र विराट सरावासाठी जाण्यास तयार होत असतानाच दरवाजातून एका चाहत्याने 'चोकली-चोकली' म्हणत त्याला ट्रोल केलं. म्हणजेच विराट अनेकदा चोक होतो म्हणजेच अडकून पडतो या उद्देशाने त्याच्या नावात बदल करुन त्याला 'चोकली' म्हणत डिवचण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला. विराटने हे शब्द ऐकल्यानंतर तो चांगलाच संतापला.चोकली-चोकली' हे शब्द ऐकताच कोहलीने सराव थांबवला आणि आवाजच्या दिशेने रागावून मान वळवली. विराटची बॉडी लँगवेज आणि नजर पाहता ही 'चोकली-चोकली'ची हाक ऐकून तो चिडलेला दिसून आला. मात्र या घोषणाबाजीनंतर विराटने चाहत्यांकडे पाहत, 'इथे नाही,' असं उत्तर दिल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल गेला गेला. 


विराटने दिलेला तो प्रतिसाद कशावर?


पण नंतर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये विराटला कोणीही 'चोकली-चोकली' म्हणत चिडवलं नसून ऑटोग्राफ आणि फोटोसाठी विचारलं होतं. चाहत्यांनी सराव सुरु होण्यापूर्वी रुमच्या दरवाजातून कोहलीकडे ऑटोग्राफसंदर्भात विचारणा केली. ते ऐकून विराटने,  'इथे नाही,' असं उत्तर दिलं होतं. मात्र 'झी 24 तास' या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नसून व्हिडीओची सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही. नव्या व्हिडीओनुसार 'चोकली-चोकली' हा भाग एडीट करुन पोस्ट करण्यात आला आहे.


नक्की वाचा >> शाहरुख अन् नेस वाडिया भिडले! IPL संघ मालकांच्या बैठकीत तुफान राडा; काव्य मारनने...


तुम्हीच पाहा व्हायरल झालेले हे दोन व्हिडीओ...


1)



2)



सरावाचं पहिलं सत्र पाण्यात


विराट कोहली सोमवारी श्रीलंकेमध्ये दाखल झाला आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी तो श्रीलंकेत आला असून सरावाचे पहिले सत्र कोलंबोमध्ये पाऊस पडत असल्याने रद्द झालं. नंतर झालेल्या सराव सत्रातील व्हिडीओ बीसीसीआयने अधिकृतपणे शेअर केलेला नाही. मात्र काही चाहत्यांनी सरावादरम्यान मैदानात उपस्थित असताना शूट केलेले व्हिडीओ व्हायरल केले आहेत.