India U19 squad for ACC Men’s U19 Asia Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी आगामी एसीसी पुरुष अंडर 19 आशिया चषक 2023 साठी (U19 Asia Cup Team) भारताच्या अंडर 19 संघाची घोषणा केली आहे. या संघात सरफराज खानचा धाकटा भाऊ म्हणजेच 18 वर्षीय मुशीर खानचा (Musheer Khan) समावेश करण्यात आला आहे. युएईमध्ये 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मेगा स्पर्धेत पंजाबचा उदय सहारन (Uday Saharan) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर सौम्य कुमार पांडे (Saumy Kumar Pandey) याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल.


पाहा कसा असेल संघ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (C), अरावेली अवनीश राव (WK), सौम्य कुमार पांडे (VC), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (WK), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.


राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.


स्टँडबाय खेळाडू : प्रेम देवकर, अंश गोसाई, मो. अमन.