U-19 World Cup Final : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना सुरु झालाय.,भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका दिली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलेय.
डरबन : १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना सुरु झालाय.,भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका दिली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलेय.
ईशान आणि कमलेशची कमाल
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा संघ ऑस्ट्रेलियात विश्वचषक खेळत आहे. पाकिस्तानला धूळ चारत अंतिम फेरीत टीमने धडक मारली. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियावर दबाव आणलाय. झटपट दोन फलंदाज बाद करण्यात आलेत. ईशान पोरेल आणि कमलेश नागरकोटीने ही कमाल करुन दाखवली.
ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का
भारताने ३२ धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. नाणेफेक जिंकत कांगारुंची प्रथम फलंदाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाची सुरुवातीला पडझड झाल्याने पृथ्वी शॉचा संघ विश्वचषकात बाजी मारणार याची चुणूक दिसून येत आहे.ऑस्ट्रेलियाच्या १४ षटकांत ६८ धावा झाल्यात.