नवी दिल्ली : सध्या चांगलीच फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाने दमदार प्रदर्शन करत रविवारी झालेल्या पहिल्याच वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करत महेंद्र सिंह धोनीच्या ७९, हार्दिक पांड्याच्या ८३ रन्सच्या जोरावर ७ विकेट गमावून २८१ रन्स केले होते.  


चेन्नईत झालेल्या या पहिल्या वनडे सामन्यात अनेक रोमांचक गोष्टी बघायला मिळाल्या. सुरूवातीला टीम इंडियाचा खेळ ढासळला होता. टीम इंडियाच्या ८७ स्कोरवर पाच विकेट गेल्या होत्या. यात रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव आणि विराट कोहली यांचा समावेश होता. 



अशात टीम इंडियाला तारण्यासाठी धोनीने जबाबदारी स्विकारली. यात त्याला तितकीच महत्वाची साथ हार्दिक पांड्याने दिली. या सामन्यात हार्दिक पंड्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ देण्यात आलं. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. या यशानंतर हार्दिकने चाहत्यांचे आभार मानले आहे.