चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तिकिटांची किंमत वाढवल्याने प्रेक्षक पाठ फिरवतील हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० सप्टेंबरपासून या सामन्यांच्या तिकीटाची विक्री सुरु झाली होती. तिकिटांची किंमत १२०० रुपये, २४०० रुपये, ४८०० रुपये, ८००० रुपये आणि १२,००० रुपयांच्या तिकिटांचा समावेश होता.


ऑनलाईन आणि मैदानाजवळ स्टॅन्डवर मिळणारी सर्व तिकिटे संपली आहेत. bookmyshow.com वर पहिले असता सर्व विभागातील तिकिटे Sold Out हा संदेश दिसतो. @CricketAus या ट्विटर अकाउंटने देखील विविध स्टॅन्डची ऑफलाईन तिकिटे संपल्याचा फोटो शेअर केला आहे.