Live Cricket Score, India vs Australia, नवी दिल्ली : फिरोज शाह कोटला मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने प्लेइंग इलेवनमध्ये २ बदल केले आहेत. युजवेंद्र चहल आणि केएल राहुलच्या जागी टीममध्ये रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने देखील २ बदल केले आहेत. जेसन बेहरनडोर्फ आणि शॉन मार्श यांच्या जागी नाथन ल्योन आणि मार्कस स्टोइनिस यांना टीममध्ये घेतलं आहे.


ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे २७३ रनचं आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ९ विकेट गमवत भारतापुढे २७३ रनचं लक्ष्य ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने १०० तर पीटर हँड्सकॉम्बने ५२ रन केले. उस्मान ख्वाजाने वनडे करिअरमधलं दुसरं शतक साजरं केलं. रिचर्डसनने २९ रनची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाने दोन-दोन विकेट घेतले आहेत. कुलदीप यादवने एक विकेट घेतला.


<



३४ व्या ओव्हरमध्ये तिसरा झटका


ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला आहे. मॅक्सवेल स्वस्तात माघारी परतला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 178 रनवर 3 विकेट आहे. मार्कस स्टोइनिस (0 रन) आणि पीटर हँड्सकॉम्ब (49 रन) क्रीजवर आहेत.


३३ व्या ओव्हरमध्ये दुसरा झटका


ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला आहे. १७५ रनवर ऑस्ट्रेलियाचे २ विकेट गेले आहेत. मॅक्सवेल (0 रन) आणि पीटर हँड्सकॉम्ब (४७ रन) क्रीजवर आहे.


ऑस्ट्रेलियाला पहिला झटका


१५ व्या ओव्हरमध्ये भारताला पहिली विकेट मिळाली. अॅरॉन फिंचला रवींद्र जडेजाने बोल्ड करत माघारी माठवलं. अॅरॉन फिंच २७ रनवर आऊट झाला. 


१० ओव्हरमध्ये ५२ रन


१० ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोर 52/0 रन आहे. उस्मान ख्वाजा (34 रन) आणि अॅरॉन फिंच (18 रन) क्रीजवर आहेत.


Here's the Playing XI for #INDvAUS pic.twitter.com/D60E9kZQXj



- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने टॉस जिंकत आधी बॅटींगचा निर्णय घेतला आहे. 





भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज शेवटचा सामना दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानात रंगत आहे. हा सामना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास असणार आहे. कारण अनेक दिवसानंतर तो त्याच्या होम ग्राऊंडवर खेळताना दिसणार आहे.