Virat Kohli Milestone: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) टी20 मालिकेतला (T20 Series) तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना हैदराबादमध्ये (Hydrabad) खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही टीम असेल. रोहितसेनेकडून क्रिकेटप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहेत. पण त्याचबरोबर क्रिकेटप्रेमींचं लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीवरही असणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर मोठा वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) होऊ शकतो. विशेष म्हणजे आतापर्यंत अशी कामगिरी एकाही भारतीय फलंदाजाला करता आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीच्या नावावर होऊ शकतो World Record
आज हैदराबादमध्ये रंगणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 85 धावा केल्या. तर टी20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावा करणारा (11000 Runs Milestone) पहिला भारतीय फलंदाज (Indian Batsman) ठरणार आहे. भारताचा एकही फलंदाज आतापर्यंत अशी कामगिरी करु शकलेला नाही. विराट कोहलीने आज हा रेकॉर्ड केला तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मोठी घटना असेल.


कोहलीची T20 मध्ये 'विराट' कामगिरी
विराट कोहली सर्व फॉर्मेटमधल्या टी20 क्रिकेटमध्ये 351 सामने खेळला आहे. यात त्याने 40.12 च्या रनरेटने 10,915 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात त्याने 85 धावा केल्या तर 11 हजार धावा करणारा तो भारताचा पहिला आणि क्रिकेट जगतातील चौथा फलंदाज ठरेल. विराटच्या आधी ख्रिस गेल, शोएब मलिक आणि कायरान पोलार्डच्या नावावर हा रेकॉर्ड जमा आहे.


T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


1. ख्रिस गेल (वेस्टइंडीज) - 463 सामने, 14562 रन


2. शोएब मलिक (पाकिस्तान) - 481 सामने, 11902 रन


3. कायरान पोलार्ड (वेस्टइंडीज) - 613 सामने 11902 रन


4. विराट कोहली (भारत) - 351 सामने, 10915 रन


5. डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 328 सामने 10870 रन


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर 71 शतकं जमा आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहली आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगबरोबर आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर टॉपवर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे 100 शतकं केली आहेत.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं


1. सचिन तेंडुलकर (भारत) - 100 शतकं


2. विराट कोहली (भारत) - 71 शतकं / रिकी पोटिंग (ऑस्ट्रेलिया) - 71 शतकं


3. कुमार संगाकारा  (श्रीलंका) - 63 शतकं


4. जॅक कॅलिस (दक्षिण अफ्रीका) - 62 शतकं


5. हाशिम अमला (दक्षिण अफ्रीका) - 55 शतकं