मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये २-०नं आघाडी मिळवली आहे. आता तिसरी वनडे ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येईल. पण आता उरलेल्या तीन वनडे मॅचसाठी भारतीय टीममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आगामी वर्ल्ड कपआधी जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळावी म्हणून भारतीय टीम वेगवेगळ्या खेळाडूंना सध्या संधी देत आहे. त्याचाच भाग म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या २ आणि उरलेल्या ३ सामन्यांसाठी टीममध्ये बदल करण्यात आले आहेत. पहिल्या २ मॅचसाठी १५ खेळाडूंमध्ये असलेल्या सिद्धार्थ कौलऐवजी भुवनेश्वर कुमारचं उरलेल्या ३ मॅचसाठी भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं आहे. सिद्धार्थ कौलला पहिल्या २ मॅचमध्ये एकही संधी मिळाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ कौल वगळता भारतीय टीममध्ये इतर बदल करण्यात आले नसले तरी, वर्ल्ड कपआधी या शेवटच्या ३ मॅच असल्यामुळे या १५ पैकी बहुतेक खेळाडूंना संधी देण्याचा विराट कोहलीचा विचार असेल. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.


८ मार्चला रांचीतल्या मॅचनंतर चौथी वनडे १० मार्चला मोहालीला आणि पाचवी वनडे १३ मार्चला दिल्लीमध्ये होईल. ही वनडे सीरिज संपल्यानंतर आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी रवाना होईल.


उरलेल्या वनडेसाठी भारतीय टीम


रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अंबाती रायुडू, केएल राहुल, ऋषभ पंत, एमएस धोनी, केदार जाधव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा