IND VS BAN 1st Test Match : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टेस्ट सीरिजचा पहिला सामना खेळवण्यात येत आहे. यात पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज आउट झाल्याने टीम संकटात असताना अश्विन आणि जडेजा हे दोघे खऱ्या अर्थाने टीम इंडियाचे संकटमोचक ठरले. पहिल्या दिवसाअंती भारताने तब्बल 339 धावांची आघाडी घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा पहिला दिवस पार पडला. यात सुरुवातीला बांगलादेशच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला बांगलादेशच्या बॉलिंग अटॅक समोर टीम इंडियाची फलंदाजी ढासळली, पहिल्या 10 ओव्हरमध्ये विराट कोहली (6) , रोहित शर्मा (6) आणि शुभमन गिल (0) या तिघांची विकेट पडली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यशस्वीने 56, ऋषभ पंतने 39 तर केएल राहुलने 16 धावांची कामगिरी केली. 


अश्विन जडेजाची मोठी पार्टनरशिप : 


ऋषभ पंत बाद झाल्यावर रवींद्र जडेजा मैदानात आला तर केएल राहुलच्या रूपाने भारताचीसहावी विकेट पडल्यावर आर अश्विनला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. दोघांनी सातव्या विकेटसाठी फलंदाजी करताना तब्बल 195 धावांची पार्टनरशिप केली. यात रवींद्र जडेजाने 117 बॉलमध्ये 86 धावा केल्या. तर आर अश्विनने 112 बॉलमध्ये 102 धावा करून शतक लगावले. या दरम्यान अश्विनने 10 चौकार आणि 2 सिक्स मारले. तर जडेजाने देखील 10 चौकार करत 2 सिक्स ठोकले. 



हेही वाचा : IND VS BAN Test : जडेजा आणि बांगलादेशी बॉलरमध्ये झाली जोरदार टक्कर, एकमेकांच्या अंगावर कोसळले Video



भारताची प्लेईंग 11:


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज


बांगलादेशची प्लेईंग 11: 


शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा