IND VS BAN 1st Test Ravindra Jadeja And Hasan Mahmud Collision : बांगलादेशचा 24 वर्षीय गोलंदाज सध्या फॉर्ममध्ये असून पाकिस्तान टेस्ट सीरीजनंतर आता भारत विरुद्ध टेस्ट सामन्यातही तो कहर करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज हसन महमूदने पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 4 विकेट्स घेतल्या. मात्र पाचवी विकेट घेण्याच्या उत्साहात त्याच्याकडून मैदानात अशी घटना घडली ज्यामुळे भारताचा ऑल राउंडर रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत होऊ शकली असती. मैदानात घडलेल्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताची फलंदाजी सुरु असताना पहिल्या इनिंगच्या 50 व्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली. भारताच्या 5 विकेट्स पडल्यावर रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे दोघे भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनी मैदानात टिकून राहत चांगली फलंदाजी केली. मात्र बांगलादेशचा युवा गोलंदाज हसन महमूद त्याची 5 वी विकेट मिळवण्याच्या प्रयत्नात होता. ओव्हरचा पहिला बॉल त्याने जडेजाला टाकला यावेळी त्याने मिड विकेटवर सुंदर असा सिक्स मारला. त्यामुळे हसन चिडला. हसनचा दुसरा बॉल चांगलं पडला, त्यावर गोलंदाजाने एलबीडब्ल्यूची अपील केली. मैदानातील अंपायरने त्याच्या बाजूने निर्णय देऊन जडेजाला बाद घोषित केले. अंपायरने बाद निर्णय दिल्यावर हसन खुश झाला आणि पाठमोरा विकेटच्या दिशेने वळला आणि मागे उभ्या असलेल्या जडेजाला जाऊन धडकला. जडेजा त्यावेळी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता मात्र हसनचा धक्क्याने तो जागीच कोसळला आणि हसन जडेजावर पडला. पण सुदैवाने दोघांना दुखापत झाली नाही.
— Cricket Cricket (@cricket543210) September 19, 2024
मैदानातील अंपायरने जडेजाला एलबीडब्ल्यू बाद घोषित केले होते. मात्र जडेजाने यावर DRS घेतला आणि थर्ड अंपायरने त्याला नॉट आउट करार दिला. सातव्या विकेटसाठी अश्विन आणि जडेजाने मोठी पार्टनरशिप केली ज्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 200 पार पोहोचली.
हेही वाचा : IND VS BAN Test : भारत - बांगलादेश सामन्यात राडा, पंत आणि लिटन दास भिडले, मैदानात नेमकं काय घडलं? Video
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा