IND VS BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच; कधी, कुठे पाहता येणार फ्री?
चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया खूप मोठ्या ब्रेकनंतर टेस्ट सामना खेळण्यासाठी उतरणार आहे.
India vs Bangladesh 1st Test Match : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी या टेस्ट सीरिजचा पहिला सामना पार पडणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया खूप मोठ्या ब्रेकनंतर टेस्ट सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. तर बांगलादेशने नुकतेच टेस्ट सिरीजमध्ये पाकिस्तानला 2-0 ने मात दिली. त्यामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास वाढला असून त्यांना हलक्यात घेणं टीम इंडियाला परवडणारं नाही.
चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवरील पिच ही नेहमी स्पिनरसाठी मदतीची ठरली आहे. त्यामुळे या सीरिजमध्ये स्पिनर गोलंदाजांचा बोलबाला राहणार असं बोललं जातं आहे. जानेवारी महिन्यात भारताने शेवटचा टेस्ट सामना इंग्लंड विरुद्ध खेळला होता यात त्यांनी इंग्लंडचा दारुण पराभव केला. तब्बल 8 महिन्यांनी भारतीय संघ पुन्हा एकदा टेस्ट सामना खेळणार असून यात स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत आणि आर अश्विन यांचं पुनरागमन झालं आहे. तर यश दयाल या युवा गोलंदाजाला टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.
भारत विरुद्ध बांगलादेश :
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 आणि 27 सप्टेंबर रोजी दोन सामन्यांची टेस्ट सिरीज पार पडणार आहे. तर त्यानंतर दोन्ही संघांमध्ये टी 20 सिरीज सुद्धा खेळवण्यात येईल. यातील पहिला सामना हा 6 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशच्या स्टेडियममध्ये पार पडेल.
Video : शुभमन किंवा हार्दिक नाही तर 'हा' आहे अनन्या पांडेचा आवडता स्पोर्ट्स स्टार
पहिल्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
कधी कुठे पाहाल सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला टेस्ट सामना 19 सप्टेंबर रोजी हा सकाळी 9: 30 वाजता सुरु होईल. तर त्यापूर्वी अर्धातास अगोदर टॉस पार पडेल. या टेस्ट सीरिजचा पहिला सामना तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर फ्रीमध्ये पाहू शकता. मात्र ही सुविधा केवळ डीडी फ्री डिश आणि अन्य DTT (Digital Terrestrial Television) उपभोक्त्यांसाठीच उपलब्ध असेल. भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाणार नाही जो केबल टीव्ही किंवा डीटीएच प्लॅटफॉर्म जसे की डिशटीव्ही, एअरटेल डिजिटल टीव्ही आणि टाटा प्लेवर प्रसारित केला जाईल. तसेच तुम्ही भारत विरुद्ध बांगलादेश पहिला सामना हा स्पोर्ट्स 18 च्या चॅनेलवर तसेच जिओ सिनेमावर सुद्धा पाहू शकता.