रोहित आणि राहणे बाद
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची खराब सुरूवात झाली असून सातव्या ओव्हरमध्ये २१ धावांमध्ये २ गडी गमावले.
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची खराब सुरूवात झाली असून सातव्या ओव्हरमध्ये २१ धावांमध्ये २ गडी गमावले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस पाचारण केले. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा १ धावेवर बाद झाला. आयपीएलचा खराब फॉर्म आजही रोहितचा कायम राहिला. त्याला रुबेल याने क्लिन बोल्ड केले.
त्यानंतर शिखरच्या साथीला आलेला अजिंक्य राहणे चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने एक शानदार स्ट्रेट ड्राइव्ह चौकारही लगावला. पण त्याला मुस्तफिजुर याने क्लिन बोल्ड केले. त्याने २१ चेंडूत ११ धावा काढल्या.
सध्या ११ ओव्हर झाल्या असून शिखर धवन आणि दिनेश कार्तिक खेळत असून भारताची स्थिती २ बाद ५७ अशी स्थिती आहे.