इंदूर : इंदूर टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉलर्सच्या समोर बांगलादेशचे बॅट्समन 150 रनवर ऑलआऊट झाले. आता टीम इंडियाचे बॅट्समन जोरदार खेळी करतील असं भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाटत होतं. पण बांगलादेशने भारतीय खेळाडूंना चांगलेच धक्के दिले. ओपनर म्हणून मैदानात उतरलेला रोहित शर्मा फक्त 6 रनवर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीजमध्ये ओपनर म्हणून डेब्यू करणारा रोहित शर्माने 132.25 च्या रनरेटने तीन टेस्ट सामन्यांमध्ये 529 रन केले होते. पण बांगलादेशच्या विरुद्ध तो लवकरत आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ट खेळाडू चेतेश्वर पुजाराने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो मोठी खेळी करेल असं वाटत असतानाच तो देखील 54 रनवर आऊट झाला.


बांगलादेशचा बॉलर अबु जाएदने भारतीय खेळाडूंना चांगलंच हैराण केलं. रोहित आणि पुजाराची त्यांनी विकेट घेतली. पण त्यानंतर त्याने विराट कोहलीला शुन्यावर आऊट केलं. 


भारताच्या दिग्गज खेळाडूंना माघारी पाठवणाऱ्या अबु जाएद याआधी कधीच इतका चर्चेत आला नव्हता. आपल्य़ा टेस्ट करिअरमधील सहावी टेस्ट खेळणारा 26 वर्षाच्य़ा या बॉलरने सगळ्यांच्या नजरा आपल्य़ाकडे आकर्षित केल्या आहेत.