लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर (Lords Cricket Ground) खेळवला जात आहे. या दुसऱ्या कसोटीचा आजचा (13 ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 364 धावा केल्या आहेत. भारताकडून या पहिल्या डावात केएल राहुल (K L Rahul) आणि 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) या सलामीवीर जोडीने उल्लेखनीय कामगिरी केली. केएलने शतक ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली. तर रोहितचं शतक अवघ्या 17 धावांनी हुकलं. केएलने 129 धावांची खेळी केली. तर रोहितने 83 धावा केल्या. या शानदार कामगिरीसाठी  दोघांचं कौतुक केलं जातंय. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकनेही (Inzamam ul Haq) या दोघांचं तोंडभरुन कौतुक केलंय. (india vs england 2nd test at lords cricket ground pakistan former captain inzamam ul haq praised to rohit sharma and k l rahul)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंझमाम काय म्हणाला?  


टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले होते. खेळपट्टीतील आद्रतेमुळे इग्लंडमध्ये पहिले 2 तास गोलंदाजासाठी अनुकूल असतात. या 2 तासांमध्ये 3-4 विकेट घेऊन टीम इंडियावर दबाव निर्माण करण्याचा विचार इंग्लंडचा होता. पण तसं झालं नाही. ज्या प्रकारे या प्रतिकूल परिस्थितीत रोहितने सुरुवात केली, ते अतुलनीय आहे", अशा शब्दात इंझमामने रोहितचं कौतुक केलं. इंझमाम आपल्या यूट्युब चॅनेलवर बोलत होता. 


टीम इंडियाची झोकात सुरुवात


"रोहितच्या या खेळीमुळे टीम इंडियाची झोकात सुरुवात झाली. याचाच फायदा केएलने घेतला. या दोघांनीही इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव बनवून ठेवला. जो फलंदाज संथपणे धावा करतो, त्यांना मी कधीच मोठी धावसंख्या उभारताना पाहिलेलं नाही. तसेच माझ्या दृष्टीने त्या धावांना काहीच महत्त्व नसतं", असंही इंझमामने नमूद केलं.  


केएलचंही कौतुक 


केएलने लॉर्ड्सवर लगावलेलं शतक हे त्याच्या कसोटीतील 6 वं शतक ठरलं. केएलने आतापर्यंत अनेकदा या 6 पैकी जास्त शतक हे भारताबाहेर लगावले आहेत. केएलचं कौतुक करताना इंझमाम म्हणाला की, "असे फार फलंदाज असतात ज्यांच्या नावे देशाबाहेर 8 ते 10 शतक असतात. अनेक फलंदाजांना तुम्ही परदेशात शतक लगावताना पाहिलं असेल. पण ते फलंदाज साधारणपणे आपल्या देशात शतकी कामगिरी करतात. त्यामुळे त्यांना अनुभव मिळतो. या अनुभवाच्या जोरावर ते बाहेर सेंच्युरी लगावतात.  पण केएल राहुल त्यांच्यापेक्षा वेगळा आहे", असं इंझमाम म्हणाला.