India vs England 4th Test Day 2 | टीम इंडियाला ती एक घोडचूक महागात पडणार का?
इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 290धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडकडे 99 धावांची आघाडी आहे.
लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा (India vs England 4th Test Day 2) खेळ सुरु आहे. टीम इंडियाला 191 धावांवर ऑलआऊट केल्यानंतर इंग्लंडे दुसऱ्या डावात 290 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात 99 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून ओली पोपने (Ollie Pope) सर्वाधिक 81धावांची खेळी केली. तर ख्रिस वोक्सने (Chris Woakes) 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) 37 तर मोईन अलीने (Moeen Ali) 35 धावांची खेळी केली. बेयरस्टो आणि मोईन अलीने केलेल्या या खेळीमुळे इंग्लंडला 99 धावांची आघाडी घेता आली. दरम्यान टीम इंडियाकडून या दरम्यान मोठी चूक झाली. (India vs England 4th Test Day 2 Moeen ali was out in jasprit bumrah over at 59.5 over but umpire denied and no review was taken)
नक्की काय झालं?
टीम इंडियाने बॅटिंगला आलेल्या इंग्लंडला सुरुवातीला जोरदार झटके देत जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. ओली पोप आणि जॉनी बेयरस्टो या जोडीने सहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करुन इंग्लंडचा डाव सावरला. यानंतर मोहम्मद सिराजने बेयरस्टोला 37 धावांवर आऊट केलं. यानंतर मोईन अली मैदानात आला.
टीम इंडिया शेवटचे 4 विकेट घेऊन इंग्लंडला ऑलआऊट करेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र ओली पोप आणि मोईन अली यो दोघांनीही चांगली भागीदारी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 71 धावांची निर्णायक भागीदारी केली. मोईल अली 35 धावा करुन माघारी परतला. मात्र मोईल अली 14 धावांवरच आऊट झाला होता. पण तो आऊट असल्याचं टीम इंडियाच्या 11 खेळाडूंपैकी कोणालाही लक्षात आलं नाही. त्यामुळे कोणीही अंपायर्सकडे अपील केली नाही. परिणामी मोईन अलीला जीवनदान मिळालं. हे सर्व इंग्लंडच्या बॅटिंगदरम्यानच्या 60 व्या ओव्हरमध्ये घडलं.
जसप्रीत बुमराह 60 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या पाचवा चेंडू मोईनच्या पॅडवर जाऊन लागला. मात्र टीम इंडियाकडून कोणीही अपील केली नाही. त्यानंतर रिप्लेमध्ये पाहण्यात आलं. तेव्हा मोईन अली एलबीडबल्यू आऊट असल्याचं निदर्शनास आलं. मात्र टीम इंडियाकडून कोणीही कोणीही अपील केली नाही. यामुळे मोईन अलीला 14 धावांवरुन 35 धावा करता आल्या. दरम्यान टीम इंडियाला या 21 धावा महागात पडणार की नाही, हे लवकरच समजेल.