India vs England: `हा` खेळाडू मॅचचा खरा नायक, मॅन ऑफ द मॅच रोहित शर्माचा खुलासा
सलामीवीर रोहितने 127 धावा केल्या होत्या, ज्यासाठी त्याला सामनावीर (man of the match) देण्यात आले.
मुंबई : लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. या विजयाची विशेष गोष्ट म्हणजे त्याचा नायक हा एकच खेळाडू नव्हता, तर संपूर्ण टीमने मिळून ब्रिटिशांचा अभिमान मोडला होता. हेडिंग्ले टेस्टमध्ये 76 धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर, टीम इंडियाने ज्या प्रकारे या सामन्यात पुनरागमन केले, त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
फलंदाजी करताना सलामीवीर रोहितने 127 धावा केल्या होत्या, ज्यासाठी त्याला सामनावीर (man of the match) म्हणून देण्यात आले, परंतु रोहित स्वतः या पुसरस्कारासाठी शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) पात्र असल्याचे मानतो.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टीव्हीवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचे वातावरण दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओ दरम्यान, रोहित शार्दुलच्या योगदानाबद्दल बोलताना दिसला. रोहित म्हणाला की, शार्दुलने पहिल्या डावात ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळे सामन्याची गती बदलली.
रोहित म्हणाला, "शार्दुल सामनावीरासाठी पात्र होता. त्याने जे केले तो मॅच विनिंग परफॉर्मन्स होता. त्याने सामन्यात दोन अर्धशतके ठोकली आणि तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने त्याच्या खेळावर खूप मेहनत घेतली आहे, मला त्याची फलंदाजी बघायला आवडते. तयारी करताना मी त्याला खूप जवळून पाहिले आहे."
या मॅचमध्ये टीम इंडियाला मॅचमध्ये परत घेऊन येताना शार्दुल ठाकूर ने ओव्हल कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये दोन बॅक टू बॅक अर्धशतके केली. जेव्हा टीम इंडिया पहिल्या डावात 191 धावांवर ऑल आऊट झाली, तेव्हा ठाकूरने टी 20 खेळ खेळत त्यातून 57 धावा केल्या. यानंतर तो दुसऱ्या डावातही थांबला नाही. त्याने 60 धावांची खेळी खेळली आणि ऋषभ पंतसोबत 100 धावांची भागीदारी खेळली. याशिवाय त्याने पहिल्या डावात एक विकेट आणि दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या.
त्याचबरोबर रोहित शर्मा पहिल्या डावात फक्त 11 धावा करू शकला. पहिल्या फ्लॉप शो नंतर, दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या संघाला चमकदार शतक आणि 99 धावांची आघाडी बैक फुटवर ढकलले. रोहितने दुसऱ्या डावात एकूण 127 धावा केल्या. ज्यामुळे रोहितच काय तर क्रिकेट चाहत्यांचे देखील हेच म्हणणे आहे की, या खेळाचा खरा नायक शार्दुल ठाकूर आहे.