नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं पहिल्या दोन मॅच हारल्या. यानंतर आता तिसऱ्या टेस्टमध्ये कोहलीच्या टीमनं जबरदस्त पुनरागमन केलं आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये १९४ रनचा पाठलाग करताना भारत ३१ रननी हरला. तर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर भारतानं दुसऱ्या टेस्टसाठी शिखर धवनला टीममधून वगळलं. पण दुसऱ्या टेस्टमध्ये आणखी दारूण पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्टसाठी शिखर धवनला पुन्हा संधी देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शिखर धवननं २६ आणि १३ रनची खेळी केली होती. तर सराव सामन्यामध्ये धवन दोन्ही इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला होता. २०१४ सालच्या सीरिजमध्येही धवन सगळ्या ५ टेस्ट खेळू शकला नाही. त्याला पहिल्या ३ टेस्ट मॅचनंतर टीममधून काढण्यात आलं.


तिसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळाल्यानंतर धवननं चांगली कामगिरी केली पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या इनिंगमध्ये धवननं ३५ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४४ रन केले. पहिल्या इनिंगमध्ये धवननं स्लिपमध्ये बटलरला कॅच दिला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये धवन आदिल रशीदच्या बॉलिंगवर स्टम्पिंग झाला.


धवननं ६६ वर्षांचं रेकॉर्ड मोडलं


मागच्या ६६ वर्षांमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये स्टम्पिंग होणारा शिखर धवन पहिला भारतीय आहे. याआधी १९५२ साली पंकज रॉय इंग्लंडमध्येच स्टम्पिंग झाले होते. त्याआधी १९३६ साली ओपनर मुश्ताक अलीही इंग्लंडमध्येच स्टम्पिंग झाले होते.