मुंबई : इंग्लंड विरुद्ध टी-20 सीरीजमध्ये विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. 3 वनडे सामन्यांच्या या सिरीजमध्य़े पहिला सामना आज संध्याकाळी ट्रेंट ब्रिज, नॉटींघममध्ये खेळला जाणार आहे. इंग्लंड संघ देखील सिरीज जिंकत वनडेमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्य़ाचा प्रयत्न करणार आहे. पण टीम इंडियासाठी हे आव्हान इतकं सोपं नसणार आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला वनडे सीरीजमध्ये पराभवाचा मोठा धक्का दिला होता. य़ाधी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात हरवण्याची कामगिरी इंग्लंडने केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इंग्लंड यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते. आयसीसी रँकिंगमध्ये जगातील टॉप 20 खेळाडूंमध्ये 8 खेळाडू या सिरीजमध्ये खेळत आहेत. सीरीज आणि सामना हायहोल्टेज असणार आहे. इंग्लंड टीम वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. 12 पैकी 10 सिरीजमध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे. भारताने शेवटचे 9 सीरीज जिंकले आहेत. जसप्रीत बुमराह टीममध्ये नसणार आहे तर इंग्लंडचा क्रिस वोक्स देखील नाही खेळणार आहे.


भुवनेश्वर कुमारच्या फिटनेसची चिंता


टीम इंडियाच्या फास्ट बॉलरच्या फिटनेस टीम इंडियासाठी आव्हान उभं करु शकतात. तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये भुवनेश्वरला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावं लागलं होतं. त्याच्या जागी पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकुर किंवा सिद्धार्थ कौलला संधी मिळू शकते.


भारतीय टीम (शक्यता)


विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, सुरैश रैना, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार/शार्दुल ठाकुर.


इंग्लंड टीम (शक्यता)


जेसन रॉय, जॉनी बेयरस्टॉ, जो रूट, इयोन मोर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोइन अली, डेविड विली, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, मार्क वुड.