टीम इंडियावर पराभवाचं संकट, एका मॅचमध्ये व्हिलन बनला हा खेळाडू
टीम इंडियाकडे ही शेवटची संधी, एक चूक आणि सामना हातून जाण्याची शक्यता
मुंबई : बर्मिंघम इथे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियावर अचानक इंग्लंड भारी पडली. आता टीम इंडियाच्या हातून सामना जातो की काय अशी एक भीतीही मनात निर्माण झाली आहे. दुसऱ्या डावात 3 विकेट गमावून इंग्लंडने 259 धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज आहे.
बेन स्टोक्स, सॅम बिलिग्स सारखे धडाकेबाज खेळाडू अजून मैदानात उतरायचे बाकी आहे. त्यामुळे टीम इंडियाचे गोलंदाज या खेळाडूंना कसे रोखणार हे मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. याच दरम्यान टीम इंडियातील स्टार खेळाडू एका मॅचमध्ये व्हिलन बनला आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 38 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज बॉलिंगसाठी आला. सिराजने चौथ्या बॉलवर इंग्लंडच्या खेळाडूनं टोलवलेला बॉल हनुमाच्या हातात गेला. मात्र हनुमाच्या हातून कॅच सुटला.
जॉनी बेअरस्टो त्यावेळी 14 धावांवर होता. जर हा कॅच सुटला नसता तर टीम इंडियाला त्याचा मोठा फायदा झाला असता. मात्र तो कॅच सुटल्यानंतर जॉनीने 72 धावांची खेळी केली. त्यामुळे हनुमाची एक चूक टीम इंडियाला खूप महागात पडली.
जॉनी बेअरस्टो आणि जो रूट या दोघांनी मिळून 150 धावा केल्या आहेत. या दोघांनी मिळून इंग्लंडला जवळपास विजयाच्या जवळ आणलं आहे. टीम इंडियाच्या पराभवाला हनुमा विहारी जबाबदार असेल अशीही एक चर्चा होत आहे. त्याने जर कॅच सोडला नसता तर आजच चित्र वेगळं असतं.
हनुमा विहारीने फलंदाजीमध्ये देखील मार खाल्ला आहेत. त्याने केवळ 20 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 11 धावा करून आऊट झाला. भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयात हनुमा विहारीने महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र त्यानंतर त्याला आपली गती कायम ठेवता आली नाही. हनुमा ऐवजी मयंकला संधी मिळायला हवी होती अशीही चर्चा आता होत आहे.