मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये आज निर्णायक सामना रंगणार आहे. दुसरा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडने तीन सामन्यांची सिरीजमध्ये 1-1 ने बरोबरी केली होती. सीरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्य़ात दोन्ही संघ जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावतील. भारताने मॅनेचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात विजय मिळवला होता पण कार्डिफमध्ये इंग्लंडने भारताला पराभवाचा धक्का दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या सामन्यात कुलदीपच्या फिरकीने भारतीय टीमसाठी विजयाचा रस्ता सोपा करुन दिला होता. पण दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कुलदीपच्या फिरकीवर पर्याय शोधून काढला आणि चांगली फंलदाजी केली. युजवेंद्र चहलला विश्वास आहे की तिसऱ्या सामन्यात ते फिरकीने इंग्लंडचा पराभव करतील. 


दुसऱ्या सामन्यामध्ये भारताकडून विराट कोहलीने 47 आणि एमएस धोनीने नाबाद 32 रन केले होते. 148 रनचं आव्हान भारताने ठेवलं होतं. मागील वर्षी भारताने इंग्लंडचा 2-1 ने पराभव केला होता. चहल आणि कुलदीपवर जबाव असणार आहे. विकेट काढण्याचं आव्हान दोघांसमोर असणार आहे.