साऊथॅम्पटन : मोईन अली आणि सॅम कुरन यांच्या पार्टनरशीपमुळे चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा डाव सावरला आहे. चहापानापर्यंत इंग्लंडचा स्कोअर १३९-६ एवढा झाला आहे. मोईन अली ३० रनवर नाबाद आणि सॅम कुरन २७ रनवर नाबाद खेळत आहे. मोईन-कुरननं ५३ रनची नाबाद पार्टनरशीप केली आहे. ८६ रनवर इंग्लंडची सहावी विकेट गेली होती.


भारताकडून जसप्रीत बुमराहनं आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर ईशांत शर्मा आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमधल्या पहिल्या दोन्ही टेस्ट भारतानं गमावल्या. यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं आणि २०९ रननी मॅच जिंकली. या सीरिजमध्ये इंग्लंड २-१नं आघाडीवर आहे. चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा