लंडन : टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज रंगणार आहे. या सीरिजची पहिली टेस्ट मॅच १ ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. या सीरिजआधी इंग्लंडचा खेळाडू जॉस बटलरनं भारतीय खेळाडूंना इशारा दिला आहे. आयपीएलदरम्यान भारतीय खेळाडूंशी मैत्री झाली होती. पण आता मी ही मैत्री विसरलो आहे आणि त्यांच्याशी मैदानात एका प्रतिस्पर्ध्यासारखा भिडणार आहे, असं जॉस बटलर म्हणाला आहे.


या आयपीएलमध्ये बटलर राजस्थानकडून खेळला. तर मोईन अली विराट कोहलीच्या बंगळुरू टीमचा भाग होता. मुंबईच्या टीममध्ये असताना हार्दिक पांड्याही माझा चांगला मित्र होता, असं बटलर म्हणाला. आयपीएलमध्ये खेळल्याचा जॉस बटलरला चांगलाच फायदा झाला. या वर्षीच्या आयपीएलमध्ये बटलरनं १३ मॅचमध्ये १५५.४ च्या स्ट्राईक रेटनं ५४८ रन केले होते.