India vs England | टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा
Ind vs Eng: 4 ऑगस्टपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार.
लंडन : श्रीलंकेत टीम इंडियाची कामगिरी दमदार सुरू आहे. मात्र सर्वांच्या नजरा अजूनही इंग्लंड दौऱ्याकडे खिळल्या आहेत. चॅम्पियनशिप पराभूत झाल्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची सीरिज जिंकणं टीम इंडियाला गरजेचं आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series) यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या 5 पैकी पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंडच्या 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
इंग्लंड स्क्वाडमध्ये कोणाची वर्णी
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉली, सॅम कुर्रान, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ले, बेन स्टोक्स , मार्क वुड. अशी 17 जणांची टीम जाहीर करण्यात आली आहे. 4 ऑगस्टपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
England Cricket (@englandcricket) July 21, 2021
दुसरीकडे टीम इंडियाला या सीरिजआधी मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे तीन दिग्गज खेळाडूंना दुखपत तर एका गोलंदाजाच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे सराव करता येणार नाही. शुभमन गिल तर पहिले तीन सामने खेळणार नाही. तर विराट कोहलीला पाठीचा त्रास सुरू झाला आहे.
उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या पायाला सूज आली आहे. त्यामुळे त्यालाही मैदानात सराव सामन्या दरम्यान खेळता आलं नाही. तर गोलंदाज आवेश खानच्या बोटाला दुखापत झाल्यानं त्याला मैदान सोडावं लागलं. अजून टीम इंडियाकडे 12 दिवस आहेत. त्यामुळे काय बदल होणार आणि कोहली कशी स्ट्रॅटेजी आखणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.