नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननी दणदणीत विजय झाला. पहिल्या दोन मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यावर तिसऱ्या मॅचमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं. भारतीय टीमची सांघिक कामगिरी या मॅचमध्ये दिसून आली. विराट कोहलीनं पहिल्या इनिंगमध्ये ९७ आणि १०३ रन केले. तर अजिंक्य रहाणेनं ८१ रनची खेळी केली. हार्दिक पांड्यानं पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना नाबाद ५२ रन केले. चेतेश्वर पुजारानं भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ७२ रन केले. जसप्रीत बुमराहनं शेवटच्या इनिंगमध्ये ५ विकेट घेऊन भारताचा विजय सोपा केला.


भारतानं पकडले १७ कॅच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका ठरली ती कॅचची. या मॅचमध्ये भारतीय टीमनं तब्बल १७ कॅच पकडले. यामध्ये विकेट कीपर ऋषभ पंत आणि लोकेश राहुलनं प्रत्येकी ७-७ कॅच पकडले. 


विराट कोहलीनं इंग्लंडच्या ओलीव पोपला आऊट करण्यासाठी स्लिपमध्ये जबरदस्त कॅच घेतला. मोहम्मद शमीच्या बॉलवर ओलीव पोपच्या बॅटच्या एजला बॉल लागला. लोकेश राहुल हा कॅच पकडेल असं वाटत असतानाच विराट कोहलीनं तिसऱ्या स्लिपमधून झेप घेतली आणि हा कॅच पकडला.