मुंबई : टीम इंडियाला आयर्लंड विरुद्ध 2 टी 20 सामन्यांची सीरिज खेळायची आहे. यासाठी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं आहे. सीनियर टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. दुसऱ्या टीमचं नेतृत्व पांड्या करणार आहे. यावेळी कर्णधार पांड्याची ढाल तीन खेळाडू होतील आणि टीम इंडियाला जिंकून देतील असा विश्वास सर्वांना आहे. हे तीन खेळाडू कोण आहेत जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. हर्षल पटेल 
हर्षल पटेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत उत्तम बॉलिंग केली. त्याने 4 सामन्यांत 7 विकेट घेतल्या. तो आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा बॉलर होता. हर्षल पटेलने डेथ ओव्हर्समध्ये किलर बॉलिंग करतो आणि त्याचा फायदा टीम इंडियाला होईल. त्याच्याकडे स्लो बॉलवर विकेट घेण्याची उत्तम कला आहे. 


2. ईशान किशन 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माच्या जागी ईशान किशन सलामीला आला. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्याने मालिकेतील 5 सामन्यात 209 धावा केल्या. ईशान किशनची बॅट चालली तर टीम इंडियाचं अर्ध टेन्शन दूर होईल. टीमला दमदार सुरुवात करण्यासाठी त्याची बॅट चालणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत तो आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकतो.


3. दिनेश कार्तिक 
दिनेश कार्तिक वयाच्या 37 व्या वर्षी टीम इंडियात परतला आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात त्याने 27 चेंडूत 55 धावांची तुफानी खेळी खेळली. महेंद्रसिंग धोनीनंतर तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा फिनिशर त्याच्या नावाची चर्चा आहे.


कार्तिककडे लाँग शॉर्ट खेळण्याची उत्तम क्षमता आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी तो गेमचेंजर ठरू शकतो. आयर्लंड सीरिजमध्ये हार्दिक पांड्यासाठी तो ढाल बनू शकतो आणि टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकतो.