रांची : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. मालिकेच्या दृष्टीने हा सामना निर्णायक आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडसाठी 'करो या मरो'चा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात उभयसंघात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. (india vs new zealand 2nd t 20i Team india win toss an choose fielding at jharkhand State Cricket Association Stadium)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रांचीतील शेवटच्या 10 सामन्यांचा निकाल 


रांचीत झालेल्या शेवटच्या 10 सामन्यांचा निकाल हा दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे. 10 सामन्यांमध्ये टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणारी टीम 4 वेळा जिंकली आहे. तर दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाचा 6 वेळा विजय झालेला आहे. त्यामुळे टॉस जिंकून दोन्ही कर्णधारांचा आधी फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न राहिल.


हर्षल पटेलचं पदार्पण 


न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार रोहित शर्माने हर्षल पटेलला पदार्पणाची संधी दिली आहे. हर्षलने आयपीएलच्या 14 व्या मोसमात गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला होता. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये एकूण 32 विकेट्स घेतल्या होत्या. यासह हर्षल आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला होता. 


हर्षलला सामन्याआधी सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या हस्ते कॅप देण्यात आली. यानंतर हर्षलचं सर्वांनी अभिनंदन केलं. 


टीम इंडियाचे शिलेदार | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि हर्षल पटेल.


न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टीम साऊथी (कॅप्टन), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, एम चॅम्पमॅन, ग्लेन फिलीप्स,  टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर,  एडम मिल्ने, इश सोढी आणि ट्रेन्ट बोल्ट