मुंबई: टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरी विशेष राहिली नाही. एखाद्या  वाईट स्वप्नाप्रमाणे ही स्पर्धा झाली. मात्र न्यूझीलंड संघाला फायनलपर्यंत पोहोचण्यात यश आलं. दुसरीकडे या स्पर्धेनंतर लगेच न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि कसोटी सीरिज आहे. या सीरिजआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड विरुद्ध सामन्यासाठी टीम इंडियाकडून 16 जणांच्या स्क्वाडची निवड करण्यात आली आहे. यांची नावं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आली आहेत. टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूझीलंडचा घातक खेळाडू दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाला आहे.


हा धडाकेबाज खेळाडू दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधील अंतिम सामना देखील खेळू शकणार नाही. याशिवाय टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरिज आणि कसोटी सीरिजमधून बाहेर झाला आहे. न्यूझीलंडचा धडाकेबाज खेळाडू डेव्हॉन कॉनवेच्या हाताला झालेल्या दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.


या दुखापतीमुळे टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये तो खेळू शकणार नाही. इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात तो आऊट झाल्यानंतर पटकन बॅट मारली आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. 


किवी संघासाठी डेव्हॉन खेळणार नसल्यानं ही वाईट बातमी आहे. डेव्हन कॉनवे हा अतिशय धोकादायक खेळाडू मानला जातो. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 50 (50.2) च्या वर आहे, तर त्याचा स्ट्राइक रेट 140 (139.35) च्या जवळ आहे. कॉनवे हा अतिशय आक्रमक खेळाडू असल्याचं सांगितलं जातं.


टीम इंडिया संघ


रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज