IND vs NZ: इशान किशनला मस्ती नडली! सामन्यातील `त्या` कृतीची पंचांनी घेतली गंभीर दखल
India vs New Zealand: मैदान कोणतंही असो नियमांचं पालन करणं तितकंच आवश्यक आहे. अनेकदा खेळाडू नियमांकडे कानाडोळा करतात आणि त्याचा फटका सहन करावा लागतो. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला स्टम्पमागील कृती चांगलीच भोवली आहे.
India vs New Zealand: मैदान कोणतंही असो नियमांचं पालन करणं तितकंच आवश्यक आहे. अनेकदा खेळाडू नियमांकडे कानाडोळा करतात आणि त्याचा फटका सहन करावा लागतो. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला स्टम्पमागील कृती चांगलीच भोवली आहे. इशानने ग्लोव्हज बॉल नसताना गुपचूपपणे बेल्स उडवल्या आणि पंचांकडे बादसाठी अपील केली. यामुळे मैदानातील पंच क्षणभरासाठी संभ्रमात पडले होते. नेमकं काय झालं तेव्हा त्यांना कळेना. फलंदाजाची बॅट स्टम्पला तर लागली नाही ना? म्हणून फिल्डवरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तेव्हा इशान किशनचा बनाव उघड झाला. या कृत्यानंतर पंचांनी संताप व्यक्त केला. नियमानुसार इशानवर चार वनडे सामन्यांची बंदीची कारवाई होणार होती. मात्र पंचांनी तसं न करता फक्त ताकीद देऊन सोडून दिलं. यामुळे इशान किशनला चांगलाच धडा मिळाला आहे.
नेमकं काय झालं होतं?
कर्णधार रोहित शर्मानं संघाचं 16 षटक कुलदीप यादवला सोपवलं. पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हेन्री निकोल्सनं चौकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर त्रिफळा उडवत हेन्री तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीप यादवनं टाकलेल्या चौथ्या चेंडूवर मात्र वेगळंच चित्र मैदानात पाहायला मिळालं. विकेटकीपर फलंदाज टॉम लॅथमनं चेंडू तटावला. मात्र बेल्स चमकल्याने मैदानात संभ्रमाचं वातावरण झालं. मैदानातील पंचांना देखील कळलं नाही. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं अपील केलं. त्यानंतर हीट विकेट्स निर्णयासाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली पण इशान किशननं घेतलेली फिरकी लक्षात आली आणि नाबाद घोषित करण्यात आलं.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमानुसार इशाननं लेव्हल 3 चे उल्लंघन केलं होतं. पंचांना विचलीत करून फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला होता. अशा कृत्यासाठी 4 ते 12 वनडे किंवा टी20 सामन्यांची बंदी घातली जाते. पण सामनाधिकारी श्रीनाथनं कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडशी चर्चा करून त्याला ताकीद दिली.
बातमी वाचा- Ind vs Nz : टीम इंडियाच वर्ल्ड कपचं स्वप्न भंगल, स्पर्धेतून झाला बाहेर
पहिल्या वनडे सामन्यात काय झालं होतं?
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 349 धावा केल्या आणि विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या सामन्यात हार्दिक पांड्याची विकेट वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. कारण हार्दिक पांड्याला त्रिफळाचीत घोषित केल्यानं क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. 40 षटकातील चौथ्या चेंडू डेरिल मिशेलनं हार्दिक पांड्याला टाकला. मात्र या चेंडूवर बेल्स चमकल्याने अपील करण्यात आली. मैदानातील पंचांना नेमकं काय झालं ते कळलं नसल्याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तेव्हा तिसऱ्या पंचाने हार्दिक पांड्याला बाद दिलं. मात्र यावरून चांगलाच वाद रंगला. विकेटकीपर कर्णधार टॉम लॅथमचा बेल्सला ग्लोव्हज लागल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.